प्रजासत्ताकदिनी आत्महत्येचा इशारा औरंगाबाद स्वतःच्या जमिनीलगत सुरू असलेल्या गौणखनिजाचे काम प्रशासनाने न थांबविल्यास प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी ध्वजवंदनानंतर सर्व कुटुंबीयांसह सामूहिकरीत्या आत्महत्या करूअसा इशारा (ग्रामीण) पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी उत्तमराव डीगुळे यांची पत्नी चंद्रकलाबाई डीगुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्यपालांना
पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात नमूद आहे की, आडगाव शिवारात त्यांची बागायती शेती आहेया शेतीलगत गट क्रमांक ६४ मध्ये अनेक दिवसांपासून गौणखनिजाचे उत्खनन करण्यात येत आहेयामुळे विहीरीचे पाणी गायब झाले असून, बागायती क्षेत्र संकटात सापडले आहे. तक्रारीनंतरही महसूल विभाग उत्खनन करणार्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे शनिवार, २६ रोजी कुटुंबीयांसह सामूहिकरीत्या ध्वजवंदन केल्यानंतर आत्महत्या करण्याचा इशारा दिला. या घटनेस स्थानिक प्रशासन व उत्खननकर्ता विनोद मुगदिया, संजय दवंडे जबाबदार राहतील, असे म्हटले आहे.